Trimbakeshwar Jyotirlinga Temple Importance in Marathi

by trimbakeshwar Org on Apr 1, 2023 PPC Advertising 415 Views

Trimbakeshwar Temple

 

 

त्र्यंबकेश्वर  हे अति प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. भारतात असणाऱ्या महादेवाचा १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंग मंदिर निर्मिती मागे विशेष कथा आहेत. जिथे जिथे ज्योतिर्लिंगाचे निर्मिती झाली तेथे महादेव स्वतः प्रकट झाल्याचे सांगितले जाते. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर  येथे ज्योतिर्लिंग प्रकट होण्या मागे देखील एक विशेष कथा आहे. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर हे फक्त ज्योतिर्लिंग मंदिरासाठीच नाही तर तेथून उगम पावणाऱ्या गोदावरी नदी साठी देखील फार प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील ब्रह्मागिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे प्रथम उगम स्थान आहे त्यानंतर गोदावरी तेथून लुप्त होते आणि त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ४०० मीटर चा अंतरावर असणाऱ्या कुशावर्त कुंडात उगम पावते. कुशावर्त कुंडातील पवित्र गोदावरी नदीचा पाण्याने अंघोळ केल्याने माणसाचे सर्व पाप धून निघतात असे म्हंटले जाते. १२ वर्षातून एकदा भरणारा कुंभ मेळा येथेच भरवला जातो. कुंभ मेळ्याचा वेळी हजारो  भाविक गोदावरीचा पाण्यात डुबकी मारण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. 

 

रामायणाचा काळात रामाने त्यांचे वडील दशरथ यांचा श्राद्ध विधी त्र्यंबकेश्वर येथेच गोदावरीचा काठी केला होता. त्र्यंबकेश्वर ची भूमी हिंदू धर्मातील पूजा करण्यासाठी फार पवित्र भूमी मानली जाते. त्र्यंबकेश्वर  येथे अनेक प्रकारचा पूजा केल्या जातात. येथील पूजा फक्त ताम्रपत्रधारी पंडित चा हातूनच केल्या जातात . त्र्यंबकेश्वर  ला ताम्रपत्रधारी पंडितांचा वारसा लाभला आहे. नानासाहेब पेशवाणी त्र्यंबकेश्वर मधील रहिवासी असलेल्या ज्ञानी, बुद्धिमान , आणि ज्यांना पूजेची अस्सल पद्धती माहित आहे अशा पंडितांना ताम्रपत्रे दिली होती. हि ताम्रपत्रे तांब्याची बनलेली आहेत. ताम्रपत्रे हि ते अस्सल पंडित असल्याचा पुरावा मानला जातो. जेव्हा तुम्ही  त्र्यंबकेश्वर मध्ये जाल तेव्हा पूजा करताना पंडित ताम्रपत्रधारी आहे कि नाही याची खात्री करून घ्या. https://www.trimbakeshwar.org/ या त्र्यंबकेश्वर चा ऑफिसिअल वेबसाइट वरून तुम्हाला ताम्रपत्रधारी पंडितांची संपूर्ण माहिती मिळेल. वेबसाइट वरून तुम्ही तुम्हाला हवी असणारी पूजा आणि ताम्रपत्रधारी पंडित घर बसल्या बुक करू शकता.

 

त्र्यंबकेश्वर ला दर्शना साठी न येऊ शकणाऱ्या भक्तांसाठी ट्रस्ट ने लाईव्ह दर्शन सुविधा सुरु केली आहे. हे लाइव्ह दर्शन तुम्ही घरबसल्या https://www.trimbakeshwar.org/ या वेबसाइट वरून घेऊ शकतात. महाशिवरात्री, श्रावणी सोमवार या दिवसांना त्र्यंबकेश्वर मध्ये हजारोंचा संख्येत भाविकांची गर्दी पाहायला मिळते. भाविकांसाठी VIP पास फॅसिलिटी देखील सुरु केली आहे. VIP पास ची किंमत फक्त २०० रुपये आहे. 

 

त्र्यंबकेश्वर मध्ये ताम्रपत्रधारी पंडित नारायण नागबली, काल सर्प दोष, पितृ दोष निवारण, त्रिपिंडी श्राद्ध, रुद्राभिषेक, कुंभ विवाह, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप, शांती पूजा इत्यादी अनेक प्रकारचा पूजा करतात. 

 

त्र्यंबकेश्वर मध्ये केली जाणारी नारायण नागबली पूजा : 

 

नारायण नागबली हि त्र्यंबकेश्वर मध्ये केली जाणारी विशेष पूजा आहे. नारायण नागबली हि पितृ दोष निवारण साठी केली जाते. नारायण नागबली पूजा फक्त त्र्यंबकेश्वर जवळील अहिल्या गोदावरी संगम आणि सती महास्मशान येथे केली जाते. नारायण नागबली पूजा विधी हि तीन दिवसाची असते. नारायण नागबली आणि नागबली या दोन वेग वेगळ्या विधी एकाच पूजेत  केल्या जातात तरच त्या पूजेचा लाभ होतो. नारायण बली पूजा हि पितरांचा शापातून मुक्त होण्यासाठी केली जाते तर नागबली पूजा हि नागदेवताला इजा केल्याचा पापातून मुक्त होण्यासाठी केली जाते. एकूणच नारायण नागबली पूजेमुळे आयुष्यात सुख, समाधान, संपत्ती, आणि सकारात्मकता निर्माण होते. 

 

 

त्र्यंबकेश्वर मध्ये केली जाणारी काल सर्प दोष पूजा : 

 

काल सर्प दोष हा खूप नकारात्मक दोष असतो. काल सर्प दोषामुळे  माणसाचा आयुष्यात खूप दुःख, कष्ट, अपयश, दारिद्र्य येऊ शकते. काल सर्प दोष असणाऱ्या व्यक्तीला सतत कष्ट करत राहावे लागतात. काल सर्प दोष मसाला त्याचा चांगल्या ध्येया पासून लांब ठेवते. हा दोष ग्रहांचा विशिष्ट स्थितीमुळे निर्माण होतो. जेव्हा सर्व ग्रह राहू आणि केतू या दोष ग्रहांचा मध्ये येतात तेव्हा काल सर्प दोष असल्याचे सूचित होते. मागील जन्मात सापाची हत्या करणाऱ्या व्यक्तीला काल सर्प दोषाचा सामना करावाच लागतो. त्र्यंबकेश्वर चा पवित्र भूमीवर महादेवाचा आशीर्वाद घेऊन सुरु केलेली पूजा खूप लाभदायक आणि सफल ठरते. काल सर्प दोष १२ प्रकारचे असतात. प्रत्येक दोषाचा परिणाम हा वेग वेगळा होत असतो. ग्रह स्थिती पाहून कोणता काल सर्प दोष आहे हे ठरवले जाते. 

 

त्र्यंबकेश्वर मध्ये केली जाणारी त्रिपिंडी श्राद्ध पूजा : 

 

त्रिपिंडी श्राद्ध विधी हा पूर्वजांचा आत्म्याचा शांती साठी केला जाणारा पिंड दान विधी असतो. व्यक्तीचा मृत्यू नंतर दर वर्षी त्याचा पुण्यतिथी दिवशी किंवा पितृ पक्षात श्राद्ध विधी करणे फार महत्वाचे असते. जर सलग ३ वर्ष हा श्राद्ध विधी केला गेला नाही तर त्या आत्म्याला त्रास होतो आणि त्याची आत्मा अतृप्त राहते. अशा आत्म्यांना शांती मिळून देण्यासाठी आणि त्यांना मोक्ष प्राप्ती करून देण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध विधी केला जातो. त्रिपिंडी श्राद्ध विधी मुळे  आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. त्यांचा अशांत आत्म्यांमुळे पुढील पिढीला खूप त्रास सहन करावा लागतो तो त्रास हि त्रिपिंडी श्राद्ध विधी मुळे नाहीसा होतो. घरात, कुटुंबात सुख समाधान, संपत्ती येऊ लागते. त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरीचा काठी ताम्रपत्रधारी पंडितांचा हातून केला जाणारा त्रिपिंडी श्राद्ध विधी खूप लाभदायक ठरतो. 

 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग रुद्राभिषेक पूजा :  

 

रुद्राभिषेक विधी हा महादेवाला प्रिय असणाऱ्या विधी पैकी एक आहे. रुद्राभिषेक विधीत महादेवाला पंचामृत ने अभिषेक घातला जातो. हा विधी लोक आयुष्यात सकारात्मकता टिकून राहावी, सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, महादेव आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी केला जातो. रुद्राभिषेक विधी मुले महादेवाची संपूर्ण कृपा  प्राप्त होते असे भक्तांचे अनुभव आहेत. महाशिवरात्री, श्रावण, प्रदोष या दिवसांना त्र्यंबकेश्वर मध्ये रुद्राभिषेक विधी करणाऱ्यांची संख्या प्रचंड पाहायला मिळते आणि या दिवसांना केली जाणारी पूजा फलदाई ठरते. महादेव हे फक्त भक्तांचा भोळ्या श्रद्धेनेच प्रसन्न होतात. त्यामुळे अनेक युगांपासून देवी देवता देखील महादेवाची पूजा करत आले आहे. रुद्राभिषेक महादेवाला खूप प्रिय असल्याचे अनेक पुराणांत लिहिले आहे.

 

जल रुद्राभिषेक - वृष्टी प्राप्ती होते  

कुशाजलाने अभिषेक - दु:ख नष्ट होते 

दही - प्राणी, घर आणि वाहन प्राप्ती होते 

उसाचे  रस - लक्ष्मी प्राप्ती होते 

मधयुक्त जल- धनसंचय होतो  

तीर्थावरील जलाने अभिषेक - मोक्षप्राप्ती होते 

सुगंधी जलाने अभिषेक - रोग नष्ट होतात

गायीच्या दुधाने अभिषेक - पुत्र प्राप्ति होते 

गंगाजलाने अभिषेक  - ज्वर बाधा नाश होते 

साखर मिश्रित अभिषेक - सद्बुद्धि प्राप्त होते 

शुद्ध तुपाने अभिषेक - वंशवृद्धी होते

मोहरीच्या तेलाने अभिषेक - रोग आणि शत्रूंचा नाश होतो  

 

कुंभ विवाह विधी : 

 

काही मुलींचा कुंडलीत जन्मतः च विधवा योग आलेला असतो. विधवा योग असणाऱ्या मुलीने जर कुंभ विवाह केल्या शिवाय जर वरशी लग्न केले तर तिचा वर लवकर मरण पावणे किंवा अपघात सारख्या समस्या येऊ शकतात. मुलीला आयुष्यभर  वैधव्य योग सहन करावा लागू नये म्हणून त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभ विवाह केला जातो. कुंभ विवाह विधी मध्ये एक मातीचा मटक्यात  ठेवलेल्या विष्णू देवाचा मूर्ती सोबत मुलीचा विवाह लावला जातो. आणि पूजा पूर्ण झाल्या नंतर मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी पंडितांचा हातून केलेला  कुंभ विवाह अधिक लाभदायक ठरतो. 

 

महामृत्युंजय मंत्र जप : 

 

‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’

 

महादेवाचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्र जपणे माणसाचे अवेळी आलेल्या मृत्यू पासून रक्षण होते, माणूस निर्भय बनतो, दुर्घटना टाळतात, शरीरातील आजार दूर होतात , सौख्य लाभते, नकारात्मक आणि दुष्ट बाधांपासून संरक्षण प्राप्त होते,  निरोगी जीवन प्राप्त होते. त्यामुळे महामृत्युंजय मंत्र जप हा महादेवाची केल्या जाणाऱ्या क्रियांपैकी शक्तिशाली क्रिया मानली जाते. त्र्यंबकेश्वर हे महादेवाचे स्वरूप आहे येथे केलेला मंत्र जप जा तुम्हाला लाभदायक  ठरतो.

 

त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या जाणाऱ्या इतर पूजा : 

 

 १) भातपूजा - मंगल दोष निवारणासाठी 

२) ऋणमुक्तेश्वर पूजा - सर्व प्रकारचा ऋणांतून मुक्त होण्यासाठी 

३) ज्वरेश्वर महादेव पूजा - माणसाला येणाऱ्या ज्वर (ताप ) निवारणासाठी 

४) अश्विनीकुमार पूजा - परिवारातील सदस्यांची व्याधी नष्ट करण्यासाठी  ( कुशावर्त कुंडावर हि पूजा केली जाते ) 

५) सर्व प्रकारच्या शांती आणि हवं पूजा ताम्रपत्रधारी पंडित करतात . 

पूजनाचा अधिक माहिती साठी https://www.trimbakeshwar.org/ या पोर्टल ला भेट द्यावी 

 

 








 

Article source: https://article-realm.com/article/Internet-Business/PPC-Advertising/41413-Trimbakeshwar-Jyotirlinga-Temple-Importance-in-Marathi.html

Comments

No comments have been left here yet. Be the first who will do it.
Safety

captchaPlease input letters you see on the image.
Click on image to redraw.

Reviews

Guest

Overall Rating:

Most Viewed Articles

Statistics

Members
Members: 17190
Publishing
Articles: 79,729
Categories: 202
Online
Active Users: 2075
Members: 6
Guests: 2069
Bots: 13593
Visits last 24h (live): 5070
Visits last 24h (bots): 32200

Latest Comments

This is also a very good post which I really enjoyed reading. It is not every day that I have the possibility to see something like this..  zonahoki28    
Bài viết cung cấp góc nhìn đáng chú ý về việc triển khai các chương trình phúc lợi xã hội của Chandrababu Naidu. Những chính sách hướng đến cải thiện đời sống người dân luôn là chủ đề đáng quan...
Bài viết mang đến góc nhìn đáng chú ý về việc triển khai các chương trình phúc lợi và tác động của chúng đối với cộng đồng. Mình nghĩ những chính sách hướng đến cải thiện đời sống người dân luôn...
What a blog. Lovely stuff.
on Oct 11, 2026 about The Latest Online Business
What a blog. Lovely stuff.
on Oct 11, 2026 about The Latest Online Business
Bài viết mang đến góc nhìn thú vị về các chương trình phúc lợi của Chandrababu Naidu và những tác động đối với đời sống người dân. Mình đánh giá cao những chính sách hướng đến cải thiện giáo dục,...
An unexpected evening spent with a Bhopal Escorts Service revealed new facets of desire. The atmosphere was relaxed, while the physical connection deepened with every passing moment. Soft...
We believe comfort is the gateway to real excitement. An Okhla Escort Service offers companions who prioritize your happiness. Our team creates space for fantasy to unfold and pleasure to...
Bài viết cung cấp góc nhìn khá thú vị về việc triển khai các chương trình phúc lợi, đặc biệt qua những thông tin cụ thể và cách tiếp cận thực tế. Nội dung giúp người đọc có thêm cơ sở để tìm hiểu...
Slope 2 represents a fascinating shift in how games keep us engaged. Instead of managing inventory or hiring staff, you're navigating a constantly shifting environment where the rules stay...

Translate To: